/ Jun 08, 2026

गुजरात टायटन्सविरुद्ध सुनील नरीनने आयपीएलचं द्विशतक ठोकलं, पहिला विदेशी खेळाडू ठरला

आयपीएल 2026 स्पर्धेतील 60वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईडर्स यांच्यात होत आहे. हा सामना सुनील नसरीनसाठी खास ठरला. कारण त्याने या सामन्यात आयपीएल सामन्यांचं द्विशतक ठोकलं. अशी कामगिरी करणारा पहिला विदेशी खेळाडू ठरला.
आयपीएल 2026 स्पर्धेत अनेक विक्रम रचले गेले असून काही विक्रमांची नोंद इतिहासात होणार आहे. कारण हे विक्रम मोडणं जवळपास अशक्य आहे. यात एक विक्रमाची भर पडली आहे. हा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू सुनील नसरीनच्या नावावर नोंदवला गेला. त्याने गोलंदाजी किंवा फलंदाजी करून हा विक्रम रचला नाही. तर सामने खेळून हा विक्रम रचला आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेतील अनोखा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे. अशी कामगिरी करणारा सुनील नरीन हा पहिला विदेशी खेळाडू ठरला. यापूर्वी असा विक्रम करणं कोणत्याही विदेशी खेळाडूला जमलं नाही आणि तेही एकाच संघासाठी… कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात प्लेइंग 11 मध्ये सुनील नरीन नाव निश्चित होताच हा विक्रम रचला गेला आहे. आयपीएल स्पर्धेत 200 सामना खेळणारा पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे. त्याच्या या विक्रमाच्या आसपास कोणताही विदेशी खेळाडू नाही.
सुनील नरीनने 2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 15 पर्वात सुनील नरीन कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. या दरम्यान कोलकाता नाईट रायडर्ससाठी तीन जेतेपद मिळवून देण्यात त्याचं मोलाचं योगदान राहिलं. सुनील नरीननंतर दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड आहे. त्याने 189 सामने खेळले आहेत. पण आता स्पर्धेतून निवृत्त झाला आहे. त्यामुळे सुनील नरीनचा विक्रम कायम असणार आहे. एबी डिव्हिलियर्स आणि डेव्हिड वॉर्नर 184 सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. हे दोन्ही खेळाडू आयपीएलमधून आऊट झाले आहेत. त्यामुळे सुनील नरीनचा विक्रम भविष्यात मोडणं कठीण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Featured Posts

Featured Posts

आमची ओळख

नाशिक समाचार लाईव्ह हे निष्पक्ष, विश्वासार्ह आणि जनतेशी जोडलेले डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आधुनिक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी, घडामोड आणि जनसामान्यांचा आवाज प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”

NASHIK SAMACHAR LIVE
नाशिक समाचार लाईव्ह

मीडिया पार्टनर

नाशिक समाचार लाईव्ह हे Lead India सोबत संलग्न अधिकृत डिजिटल मीडिया पार्टनर आहे.
Licensed & Registered Under :
RNI No. Delhi N/2015/64915

Ref : Fre/LI/NAS/MAH/28/09/753/25
Issue Date : 01/09/2025
Renewal Date : 01/09/2026