/ Jun 09, 2026

दोनच वर्षापूर्वी प्रचंड मोठा विजय, आता स्वतःच्याच पक्षातून पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, यूकेत काय सुरू?

यूकेचे पंतप्रधान सर किअर स्टार्मर यांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांच्याच खासदारांकडून होते आहे. या मागणीत वाढ होते आहे. मात्र दुसऱ्या बाजूला किअर स्टार्मर यांनी ते ‘सरकार चालवत राहतील’ असं म्हटलं आहे.

ज्या व्यक्तीनं 2 वर्षांपूर्वी निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर लोकांमध्ये अप्रिय ठरलेल्या धोरणांवरून अनेक वेळा यू-टर्न घेतले आणि अनेक घोटाळ्यांना सामोरं गेला, अशा व्यक्तीसाठी हा नाट्यमय बदल आहे.

संपूर्ण इंग्लंडमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत लेबर पार्टीच्या जवळपास 1500 नगरसेवकांचा पराभव झाला. त्यानंतर वाढत्या असंतोषाचं चिन्ह म्हणून सरकारमधील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी राजीनामे दिले आहेत.

माजी उपपंतप्रधान अँजेला रेनर, माजी आरोग्य सचिव वेस स्ट्रीटिंग आणि ग्रेटर मँचेस्टरचे महापौर अँडी बर्नहॅम हे यूकेचं नेतृत्व करण्यासाठीचे म्हणजे पंतप्रधानपदाचे संभाव्य दावेदार मानले जात आहेत.

ही परिस्थिती का निर्माण झाली?

गेल्या आठवड्यात पार पडलेल्या स्थानिक निवडणुकांच्या एका फेरीनंतर सध्याचं हे नेतृत्वाचं संकट निर्माण झालं.

अर्थात काही काळापासून सर किअर स्टार्मर यांच्या नेतृत्वाबाबत नाराजी किंवा असंतोष वाढतच होता.

गेल्या वर्षी, किअर स्टार्मर यांच्या सरकारनं एकाच महिन्यात 3 प्रमुख धोरणं बदलली होती. त्यांच्या स्वत:च्याच पक्षात अंतर्गत दबाव निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.

तर या वर्षाच्या सुरुवातीला असं उघड झालं की, लॉर्ड मँडेलसन यांची राजदूत म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी पडताळणी किंवा छाननी झाली असता त्यात ते अपात्र ठरले होते. मात्र तरीदेखील त्यांची अमेरिकेतील ब्रिटिश राजदूत म्हणून नियुक्ती झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Featured Posts

Featured Posts

आमची ओळख

नाशिक समाचार लाईव्ह हे निष्पक्ष, विश्वासार्ह आणि जनतेशी जोडलेले डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आधुनिक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी, घडामोड आणि जनसामान्यांचा आवाज प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”

NASHIK SAMACHAR LIVE
नाशिक समाचार लाईव्ह

मीडिया पार्टनर

नाशिक समाचार लाईव्ह हे Lead India सोबत संलग्न अधिकृत डिजिटल मीडिया पार्टनर आहे.
Licensed & Registered Under :
RNI No. Delhi N/2015/64915

Ref : Fre/LI/NAS/MAH/28/09/753/25
Issue Date : 01/09/2025
Renewal Date : 01/09/2026