/ Jun 09, 2026

‘माझ्याकडे दैवी शक्ती..’ 54 वर्षीय अब्दुलकडून 7 जणींवर बलात्कार

अब्दुल हलीम खान याने आपल्या धार्मिक पदाचा गैरवापर करून 2005 ते 2014 या नऊ वर्षांच्या कालावधीत मुस्लिम समाजातील सात महिला आणि मुलींचे शोषण केले.
अलौकिक शक्ती असल्याचा दावा करून 12 वर्षांच्या लहान मुलींसह अनेक महिलांवर बलात्कार करणाऱ्या ईस्ट लंडनमधील एका भारतीय इमामाला किमान 20 वर्षांच्या कारावासासह जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अब्दुल हलीम खान याने आपल्या धार्मिक पदाचा गैरवापर करून 2005 ते 2014 या नऊ वर्षांच्या कालावधीत मुस्लिम समाजातील सात महिला आणि मुलींचे शोषण केले, असे ब्रिटनच्या ‘द इंडिपेंडंट’ या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. ईस्ट लंडनच्या ओल्ड फोर्ड रोडवरील 54 वर्षीय अब्दुल हलीम खान याने पीडितांना सांगितले होते की, ‘जबरदस्तीने लैंगिक कृत्य करत असताना त्याच्या अंगात ‘अलौकिक आत्मा’ संचारलेला होता किंवा तो त्याच्या रूपात होता,’ असे ब्रिटनच्या ‘स्काय न्यूज’ने वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Featured Posts

Featured Posts

आमची ओळख

नाशिक समाचार लाईव्ह हे निष्पक्ष, विश्वासार्ह आणि जनतेशी जोडलेले डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आधुनिक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी, घडामोड आणि जनसामान्यांचा आवाज प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”

NASHIK SAMACHAR LIVE
नाशिक समाचार लाईव्ह

मीडिया पार्टनर

नाशिक समाचार लाईव्ह हे Lead India सोबत संलग्न अधिकृत डिजिटल मीडिया पार्टनर आहे.
Licensed & Registered Under :
RNI No. Delhi N/2015/64915

Ref : Fre/LI/NAS/MAH/28/09/753/25
Issue Date : 01/09/2025
Renewal Date : 01/09/2026