/ Jun 09, 2026

मान्सून अंदमानात दाखल, केरळमध्ये आठवडाभरात आगमन, ‘असा’ आहे हवामानाचा अंदाज

नैऋत्य मोसमी वारे अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे.

मान्सूननं निकोबार बेटे पूर्णपणे व्यापली असून अंदमान बेटांचा काही भाग, अंदमान समुद्राचा बहुतांश भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिणेकडचा काही भाग, अरबी समुद्राचा आग्नेय भाग तसंच श्रीलंकेचा काही भाग व्यापला आहे.

दरवर्षी साधारण 20 मेच्या आसपास अंदमानातून मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात होते. यंदा 4 दिवस आधीच मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे.

यंदा केरळमध्येही तो वेळेच्या थोडा आधी म्हणजे 26 मेच्या आसपास दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

पुढच्या 3-4 दिवसांत केरळ आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.

तसंच महाराष्ट्रात दक्षिणेकडेचे जिल्हे, मराठवाड्याचा काही भाग आणि किनारी प्रदेशातील काही भागांत 17 मेपासून सोसाट्याचा वारा, वीजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाली असली, तरी मध्य भारतात आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांतही काही ठिकाणी उष्ण दिवस आणि उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती कायम राहील.

दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमान 42 ते 45 अंश सेल्सियसपर्यंत वर जाऊ शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Featured Posts

Featured Posts

आमची ओळख

नाशिक समाचार लाईव्ह हे निष्पक्ष, विश्वासार्ह आणि जनतेशी जोडलेले डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आधुनिक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी, घडामोड आणि जनसामान्यांचा आवाज प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”

NASHIK SAMACHAR LIVE
नाशिक समाचार लाईव्ह

मीडिया पार्टनर

नाशिक समाचार लाईव्ह हे Lead India सोबत संलग्न अधिकृत डिजिटल मीडिया पार्टनर आहे.
Licensed & Registered Under :
RNI No. Delhi N/2015/64915

Ref : Fre/LI/NAS/MAH/28/09/753/25
Issue Date : 01/09/2025
Renewal Date : 01/09/2026