/ Jun 09, 2026

राकेश बापटसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर तेजश्री प्रधानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

गेल्या काही दिवसांपासून तेजश्री प्रधान ही बिग बॉस अभिनेता राकेश बापटशी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यावर थेट तेजश्री प्रधानने प्रतिक्रिया दिली आहे. ती काय म्हणाली जाणून घ्या…


मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून तेजश्री प्रधान आणि बिग बॉस मराठीमधील अभिनेता राकेश बापट लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यावर तेजश्री प्रधानने प्रतिक्रिया देण्यात आली आहे.


राकेश बापटची बहिण शितलने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शितल यांनी “मी काही दिवसांपूर्वी राकेशला एक बातमी दाखवली होती. एक रील सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्या व्हिडीओमध्ये राकेश बापट आणि तेजश्री प्रधान मे महिन्यात लग्न करणार असल्याचं सांगितलं जात होतं. तेव्हा राकेश बिग बॉसच्या घरात होता” असे म्हटले होते.

पुढे शितलने, माझ्या मैत्रिणी मला व्हिडीओ पाठवत होत्या आणि विचारत होत्या, अगं आता ही कोणती सून? पण प्रत्यक्षात त्या दोघांचा काहीच संबंध नाही. लोक उगाचच चर्चा रंगवत होते. त्या व्हिडीओमध्ये तर त्यांच्या लग्नाची तारीखसुद्धा सांगितली होती. पण असं काहीच घडलं नव्हतं. हा व्हिडीओ फेक असल्याचे शितलने सांगितले होते. त्यानंतर आता याबाबत चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Featured Posts

Featured Posts

आमची ओळख

नाशिक समाचार लाईव्ह हे निष्पक्ष, विश्वासार्ह आणि जनतेशी जोडलेले डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आधुनिक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी, घडामोड आणि जनसामान्यांचा आवाज प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”

NASHIK SAMACHAR LIVE
नाशिक समाचार लाईव्ह

मीडिया पार्टनर

नाशिक समाचार लाईव्ह हे Lead India सोबत संलग्न अधिकृत डिजिटल मीडिया पार्टनर आहे.
Licensed & Registered Under :
RNI No. Delhi N/2015/64915

Ref : Fre/LI/NAS/MAH/28/09/753/25
Issue Date : 01/09/2025
Renewal Date : 01/09/2026