/ Jun 09, 2026

IPL 2026 Playoff: चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेऑफचं गणित आरसीबीच्या हाती, कसं काय ते समजून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई सुपर किंग्स संघ आहे. अजूनही चेन्नई सुपर किंग्सचं 16 गुणांचं गणित सुटू शकतं. दोन सामन्यांच्या खेळ शिल्लक आहे. पण ऋतुराज गायकवाडच्या संघाचे प्लेऑफमधील भवितव्य आता केवळ त्यांच्या हातात राहिलेले नाही. त्यासाठी एक सुटणं गरजेचं आहे.
आयपीएल 2026 स्पर्धेत 59 सामन्यांचा खेळ संपला असून आता प्लेऑफची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांनी 16 गुणांचं गणित सोडवलं आहे. पण अजूनही या दोन्ही संघांचं प्लेऑफमधील स्थान काही पक्कं झालेलं नाही. पण ढोबळमानाने 16 गुण मिळवलेला संघ प्लेऑफमध्ये पोहोचतो. असं असताना हे दोन संघ वगळतात इतर संघांमध्ये अजूनही प्लेऑफच्या आशा जिवंत आहेत. यापैकी चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं गणित सुटू शकते. यासाठी एक समीकरण जुळून येणं गरजेचं आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने 12 सामने खेळले असून 6 विजय आणि 6 पराभवासह 12 गुण मिळवले आहेत. त्यांचा नेट रनरेट हा +0.027 इतका असून सहाव्या स्थानावर आहे. अजूनही दोन सामन्यांचा खेळ शिल्लक असून त्यात विजय मिळवला तर 16 गुणांचं गणित सुटू शकते. चेन्नई सुपर किंग्सचे पुढील प्रतिस्पर्धी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स आहेत. या दोन्ही संघांनी पराभूत केलं तर 16 गुण होतील.
चेन्नई सुपर किंग्सने उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफचा मार्ग सोपा होईल. पण पुढील दोन विजयांमुळे प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार नाही, कारण सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांचेही दोन सामने शिल्लक आहेत. या दोन्ही संघांनी त्यांचे पुढील दोन सामने जिंकले, तर त्यांचे अनुक्रमे 18 आणि 17 गुण होतील. यासाठी यासाठी चेन्नई सुपर किंग्स संघाचा प्लेऑफचं गणित रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या हाती आहे. कारण सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स संघ त्यांचे पुढील सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळणार आहेत. जर आरसीबीने हे सामने जिंकले, तर चेन्नई सुपर किंग्स संघाचा प्लेऑफचा मार्ग सोपा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Featured Posts

Featured Posts

आमची ओळख

नाशिक समाचार लाईव्ह हे निष्पक्ष, विश्वासार्ह आणि जनतेशी जोडलेले डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आधुनिक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी, घडामोड आणि जनसामान्यांचा आवाज प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”

NASHIK SAMACHAR LIVE
नाशिक समाचार लाईव्ह

मीडिया पार्टनर

नाशिक समाचार लाईव्ह हे Lead India सोबत संलग्न अधिकृत डिजिटल मीडिया पार्टनर आहे.
Licensed & Registered Under :
RNI No. Delhi N/2015/64915

Ref : Fre/LI/NAS/MAH/28/09/753/25
Issue Date : 01/09/2025
Renewal Date : 01/09/2026