/ Jun 06, 2026

NEET: कथित पेपरफुटी प्रकरणी लातूरमधल्या कोचिंग क्लास संचालकांची चौकशी, आतापर्यंत काय काय घडलं?

NEET-UG 2026 परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) शुक्रवारी (15 मे) लातूरमधल्या एका प्रसिद्ध कोचिंग क्लासच्या संचालकांची चौकशी केली. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं.

लातूरमधल्या एका क्लासच्या संचालकांची सीबीआयच्या पथकाने गुरुवारी (14 मे) रात्री आणि शुक्रवारी (15 मे) पहाटे चौकशी केली.

लातूरमध्ये असलेल्या सीबीआयच्या पथकात 28 सदस्यांचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणी गुरूवार (14 मे) संध्याकाळपर्यंत सीबीआयने सात जणांना अटक केली होती. तसेच देशभरातील 14 ठिकाणी छापे टाकले होते.

सीबीआयने या कारवाईबाबत प्रसिद्धिपत्रकात म्हटले होते की, “सीबीआयने याप्रकरणी मंगळवारी (12 मे) गुन्हा नोंदवला होता. हा गुन्हा शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला आहे. ही तक्रार NEET-UG 2026 परीक्षेतील कथित पेपर फुटीच्या आरोपांशी संबंधित आहे.”

या प्रकरणी बुधवारी (13 मे) एकूण 5 जणांना अटक करण्यात आली होती, तर आता गुरुवारी (14 मे रोजी) आणखी दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

सीबीआयच्या विशेष पथकांनी मंगळवारपासून सातत्यपूर्ण कारवाया सुरू केल्या आहेत. त्याच मोहिमेअंतर्गत गेल्या 24 तासांत आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यातील एका व्यक्तीला पुण्यातून तर दुसऱ्या व्यक्तीला अहिल्यानगर येथून अटक केली.

इतर अनेक संशयितांची चौकशी सुरू असून पुढील कारवाई केली जात आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती सीबीआय तपासून पाहत आहे, असे त्यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Featured Posts

Featured Posts

आमची ओळख

नाशिक समाचार लाईव्ह हे निष्पक्ष, विश्वासार्ह आणि जनतेशी जोडलेले डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आधुनिक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी, घडामोड आणि जनसामान्यांचा आवाज प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”

NASHIK SAMACHAR LIVE
नाशिक समाचार लाईव्ह

मीडिया पार्टनर

नाशिक समाचार लाईव्ह हे Lead India सोबत संलग्न अधिकृत डिजिटल मीडिया पार्टनर आहे.
Licensed & Registered Under :
RNI No. Delhi N/2015/64915

Ref : Fre/LI/NAS/MAH/28/09/753/25
Issue Date : 01/09/2025
Renewal Date : 01/09/2026