‘पत्र्याच्या घरात कुलर काम करत नाही जीव घाबरतो, उलट्या होतात’, सर्वाधिक तापमानात हातावर पोट असणारे कसे जगतात?
“रात्रभर झोप येत नाही. बाहेर झोपायला गेलं तर डास चावतात आणि घरात आलं तर गर्मी झोपू देत नाही. असं वाटतं दुसऱ्याच्या घरात निघून जावं. माझं बाळ पण राहत नाही. आम्ही काय करणार?” उकाड्यामुळं हैराण झालेल्या सीमा पांढरे वैतागून बोलत होत्या. सीमा अकोल्यात खरप भागात राहतात. त्यांचं झोपडीवजा घर पूर्णपणे पत्र्याचं आहे. त्यांच्या घराच्या भिंतीही पत्र्याच्याच...



